ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalCalendarनेहमीचे प्रश्नशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 ग्राहक तक्रार मंचाविषयी

Go down 
लेखकसंदेश
Admin
Site Administrator
Site Administrator


लिखाणांची संख्या : 5
Join date : 30/03/2011

ग्राहक तक्रार मंचाविषयी Empty
लिखाणविषय: ग्राहक तक्रार मंचाविषयी   ग्राहक तक्रार मंचाविषयी Icon_minitime12/4/2011, 5:28 pm

आपली तक्रार कोणीही ऐकून घ्यायला तयारच नसतो. पण आता मात्र "तक्रार करायची सोयच नाही" असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण केवळ तक्रारी करण्यासाठीच हा एक स्वतंत्र मंच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. पण येथे फक्त तक्रारीच आहेत अशी तक्रार मात्र तुम्ही करु नका बरं का!

मंचाचा उद्देश

तक्रारीविषयी इंटरनेटवर सर्च करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, इंटरनेटवर आज जे काही तक्रार मंच (Complaint Forum) आहेत ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेतूनच आहेत. ही बाब मराठी मातृभाषा असलेल्या मराठी भाषिकांना अडचणीची ठरते. तेव्हा मराठी भाषेतून आपल्या तक्रारी मांडण्याची सुविधा उपलब्ध केल्यास ते मराठी बांधवाना फायद्याचे ठरेल या दृष्टीकोनातून या "ग्राहक तक्रार मंचाची" निर्मिती करण्यात आली आहे.


१) सर्वांना आपल्या तक्रारी मराठी भाषेतून मांडता येतील.

२) ज्या उत्पादन/सेवेविषयी सार्वजनिकरित्या तक्रारी केल्या जात असतील, त्या उत्पादकावर/सेवा पुरवठादारावर दबाव निर्माण होऊ शकेल.

३) तक्रारीशी संबंधित उत्पादक/सेवा पुरवठादारांचे प्रतिनिधींनी या मंचावरील त्यांच्याशी संबंधित अशा तक्रारींचे निराकरण या मंचाद्वारे करावे अशी अपेक्षा आहे.

४) एखाद्या उत्पादनाचा किंवा सेवेचा काही ग्राहकांना जर वाईट अनुभव आला असेल व त्यांचे समाधान करण्यात संबधितांना अपयश आले असेल, तर त्यांचे अनुभव लक्षात घेऊन इतर ग्राहक ही सावध होऊ शकतील. अशी सेवा किंवा उत्पादन घेण्यापूर्वी त्यांना आपले मत तयार करण्यास मदत होईल.

आवाहन

आपण आपल्या तक्रारी येथे अवश्य लिहा. इतरांनाही याविषयी सांगा.

आपल्या तक्रारीचे या मंचाद्वारे जर निराकरण, समाधान झाले तर त्याविषयी प्रतिक्रिया देण्यास विसरू नका.

अधिकाधिक सुधारणा होण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

वापस वरती Go down
 
ग्राहक तक्रार मंचाविषयी
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: ग्राहक तक्रार मंचाविषयी-
येथे जा: